सतीश शेट्टी हत्येप्रकरणी पॉलिग्राफ चाचणीला सुरूवात

May 23, 2012 9:25 AM0 commentsViews: 32

23 मे

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी संशयितांच्या पॉलिग्राफ चाचणीला आजपासून सीबीआयने सुरूवात केली आहेत. ही चाचणी तीन टप्यात होणार असून आज तळेगाव दाभाडेतील संशयितांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये तळेगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, तसेच नगरसेवक बापु भेगडे यांच्यासह अन्य काही नागरीकांचा समावेश होता. तर उद्या, ह्या चाचणीसाठी या खटल्याशी संबंधीत असलेल्या इतर संशयितांना बोलावण्यात येणार आहे. यामध्ये तत्तकालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब अंादळकर, निरीक्षक सुनील टोणपे, आणि अन्य 4 हवालदारांचा समावेश आहे. तर या चाचणीच्या अंतिम टप्यात आयआरबी चे संचालक वीरेंंद्र म्हैसकर, सुनिल जाधव, आरोपी डोंगर्‍या राठोड यांच्यासह पाच ते सात जणांची चाचणी घेतली जाणार आहे.

close