‘अधिकारी आमचं ऐकत नाही’

May 23, 2012 9:40 AM0 commentsViews: 3

23 मे

राज्यात दुष्काळाच्या छळा पोहचत असताना प्रशासनाचे अधिकारी आमचं ऐकत नाही अशी तक्रार खुद्द तीन मंत्र्यांनी केली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्री आर.आर.पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तसेच मधुकर चव्हाण यांनी ही तक्रार केली. दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी प्रशासन ऐकत नाही अशी तक्रार या मंत्र्यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्यसरकारने 11 जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. सातारा,सांगली,विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील 11 जिल्हांसाठी हा निधी जाहीर करण्यात आला आहे. या जिल्हातील दुष्काळाबाबत मंत्र्यांनी काही उपयोजना सांगितल्या असता अधिकार्‍यांकडून फक्त मान हालवली जाते मात्र कारवाई काहीच होत नाही. यामुळे वैतागलेल्या मंत्र्यांनी अधिकार्‍यांची तक्रार केली आहे. यावर नियमांचा बागुलबुवा न करता काम करा अशा सुचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या आहेत.

close