सीना कोळेगाव धरणाचं पाणी पेटलं

May 24, 2012 9:43 AM0 commentsViews: 7

24 मे

उस्मानाबाद सीनाकोळेगाव पाणी प्रश्नाचा वाद आणखी पेटला आहे. धरणाचं पाणी सोलापूर जिल्ह्याला द्या, असे आदेश मागिल महिन्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. त्यांच्या या आदेशानं हा वाद सुरु झाला. मुख्यमंत्र्यांनी सोलापुरला काही अटींची पुर्तता करा आणि पाणी घ्या असं सोलापूर जिल्हाधिकार्‍यांना सांगितलं होतं. काल सोलापूर जिल्हाधिकारी यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून पाणी सोडा असं सुचित केलं होतं. सोलापुरला पाणी देण्यास जोरदार विरोध होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं या धरणावर आणि परांडा शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सर्वपक्षीय नेते आणि शेतकर्‍यांचा भावना संतप्त असल्याने परांडा शहरात सध्या तमावाची परिस्थिती आहे. दरम्यान, या पाणी प्रश्नावरुन संतप्त राजकीय नेत्यांनी उद्या होणार्‍या विधान परीषद निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकला आहे.

close