‘विलासराव देशमुख,सुशीलकुमार शिंदे, हाजिर हो !’

May 23, 2012 10:17 AM0 commentsViews: 10

23 मे

आदर्श घोटाळाप्रकरणी आता आयोगाने विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना साक्षीसाठी बोलावलं आहे. विलासराव देशमुख यांना 21 आणि 22 जून रोजी तर सुशीलकुमार शिंदे यांना 25 आणि 26 जूनला साक्षीसाठी बोलावलं आहेत. या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना आयोगानं प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी सूट दिली होती. पण याचाच आधार घेत काल माजी मुख्यमंत्री आणि आदर्श प्रकरणातील आरोपी अशोक चव्हाण यांनी आपल्यालाही सूट देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आयोगानं देशमुख आणि शिंदे या दोघांनाही पुन्हा साक्षीसाठीसाठी हजर राहायला सांगितलंय. दरम्यान, अशोक चव्हाण यांना प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी सूट द्यायची की नाही यावर आयोग आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.

close