मुंबईचा गेम ओव्हर,चेन्नईचा ‘सुपर’ विजय

May 24, 2012 10:11 AM0 commentsViews: 4

24 मे

महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सला स्पर्धेतून आऊट केलंय. आयपीएलच्या दुसर्‍या प्ले ऑफमध्ये चेन्नईनं मुंबईचा 38 रन्सनं पराभव करत क्वालिफायर राऊंडमध्ये धडक मारली आहे. मुंबईनं टॉस जिंकून चेन्नईला पहिली बॅटिंग दिली. धवल कुलकर्णीनं एकाच ओव्हरमध्ये मुरली विजय आणि सुरेश रैनाला आऊट करत चेन्नईला धक्का दिला. पण यानंतर मायकेल हसी आणि बद्रीनाथनं चेन्नईची इनिंग सावरली. ही जोडी आऊट झाल्यानंतर कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं तुफान फटकेबाजी करत टीमला 187 रन्सचा टप्पा गाठून दिला. याउलट मुंबई इंडियन्सची सुरुवात दणदणीत झाली. सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथनं पहिल्या विकेटसाठी 47 रन्सची पार्टनरशिप केली. पण सचिन तेंडुलकर रनआऊट झाला आणि मुंबईचे इतर बॅट्सन ठराविक अंतरानं पॅव्हेलिअनमध्ये परतले. मुंबईनं 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत 149 रन्स केले.

close