अलाहाबादमध्ये झोपडपट्टीत स्फोट,6 ठार

May 23, 2012 11:28 AM0 commentsViews: 1

23 मे

उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद येथील करेली भागात साडे तीनच्या सुमारास झोपडपट्टीमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात 15 जण जखमी झाले आहेत. मृतांंमध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या स्फोटामुळे जवळ असलेल्या एका दुचाकीला आग लागली आहे. अलाहाबाद हायकोर्टापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर हा परिसर आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्याच्या बाजूलाच लहान मुलं खेळत होती. मात्र हा स्फोट का झाला याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून घटनेची चौकशी करत आहे.

close