अभिनव कॉलेज बंद प्रश्नी समिती स्थापन

May 23, 2012 12:00 PM0 commentsViews: 1

23 मे

पुण्यातील अभिनव कॉलेज बंद करण्याच्या निर्णय अलीकडे घेण्यात आला. या प्रकरणात आता राज्य सरकारतर्फे एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कॉलेजच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मग याविषयी निर्णय घेणार आहे. शुक्रवारी ही समिती पुण्यात येऊन पदाधिकारी तसेच विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचं समजतेय. त्यानंतर ही समिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्याकडे अहवाल सादर करेल. त्यानुसार कॉलेजसंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. अभिनव कॉलेज बंद करु नये यासाठी सामाजिक संघटना आणि मान्यवरांनी मागणी केली आहे. सोमवारी याबद्दल झालेल्या बैठकीत जेष्ठ लेखक मंगेश तेंडुलकर यांनी अभिनव कॉलेज हा ऐतिहासिक वारसा आहे तो जपला पाहिजे अशी मागणी केली होती.

close