नाशिक विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी-सेनेत ‘काटे की टक्कर’

May 24, 2012 11:20 AM0 commentsViews: 9

24 मे

नाशिकमध्ये होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काट्याची टक्कर रंगली आहे. खरं तर राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या या मतदार संघात काँग्रेस-रा़ष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य आहेत. मात्र, काँग्रेसमधील नाराज गट, मनसेची निर्णायक भूमिका, तिसर्‍या महाजसह इतरांची कौल आणि लाखोंचे सौदे यामुळे ही लढत चुरशीची बनली आहे. बहुमतासाठी 239 चा आकडा गाठणं गरजचं आहे. राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरत त्यांच्याकडे 145 सदस्य आहे तर काँग्रेसकडे 77 सदस्य आहे.त्यामुळे बहुमतासाठी आघाडीचा आकडा 222 होते. पण आघाडीत बिघाडी होत असल्यामुळे लढत चुरशीची बनली आहे.

नाशिक विधान परिषद

एकूण सदस्य संख्या – 476 बहुमताचा आकडा – 239

संख्याबळ

राष्ट्रवादी – 145काँग्रेस – 77शिवसेना – 81भाजप – 32मनसे – 50इतर पक्ष – 40तिसरा महाज – 31

close