अखेर मुंडे हॉस्पिटलला सील ठोकले

May 24, 2012 11:43 AM0 commentsViews: 1

24 मे

अखेर बीड जिल्ह्यातील परळी येथील डॉ सुदाम मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलला सील ठोकण्यात आलं आहे. आज पोलिसांनी थेट कारवाई करत मुंडे हॉस्पिटलला टाळे ठोकले आहे. काल बुधवारी हॉस्पिटलमध्ये राजरोसपणे सुरु असलेल्या गैरकारभारामुळे हे हॉस्पिटल सील केलं जावं असा अहवाल परळीच्या पोलीस अधिक्षकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दिला होता. त्यानुसारही आजही कारवाई करण्यात आली आहे. तसेच मुंडे हॉस्पिटमधल्या अनधिकृत बांधकामाची चौकशी करण्याचे आदेशही बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी परळी नगरपरिषदेच्या सीईओंना दिले आहेत. हॉस्पिटलवर तर कारवाई झाली पण फरार असलेल्या डॉ मुंडे दांम्पत्यावर कधी कारवाई करणार असा सवाल आता विचारला जातोय. पण डॉ. मुंडे दाम्पत्य फरार नसल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे. दरम्यान, परळीत राजरोसपणे सुरु असलेल्या डॉ. मुंडेंच्या काळ्या कारनाम्यांविरोधात आज महिला संघटनांनी मोर्चा काढला.

close