एनडीएची 31 मे रोजी ‘भारत बंद’ची हाक

May 24, 2012 12:14 PM0 commentsViews: 1

24 मे

पेट्रोलच्या दरात साडे सात रुपयाने झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडलं आहे. आजपर्यंत कधी नव्हे ते इतकी मोठी दरवाढ झाल्यामुळे महागाईच्या वणव्यात पेट्रोलचा भडका उडाला आहे. आज देशभरात विविध ठिकाणी दरवाढीचा निषेध केला जात आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असताना आता एनडीएने पेट्रोल दरवाढीविरोधात देशव्यापी संपाची हाक दिली आहे. येत्या 31 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये शिवसेनाही सहभागी होणार आहे. सुषमा स्वराज यांनी आज फोनवरुन यासंदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बंदमध्ये एनडीएच्या सर्व घटकपक्षांनी सहभागी व्हावं यासाठी आता भाजपनं प्रयत्न सुरू केले आहे.

close