रेल्वे इंजिन पॅसेंजरवर आदळले, 40 जखमी

May 24, 2012 2:17 PM0 commentsViews: 8

24 मे

जालन्याजवळ पॅसेंजर गाडीचं इंजिन बदलताना झालेल्या विचित्र अपघातात 40 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सातोना- उस्मानपूर या रेल्वेस्टेशनच्या दरम्यान ही घटना घडली. नगरसोल-नांदेड पँसेजरचं इंजिन या स्टेशन दरम्यान बंद पडलं. त्यामुळे परभणीवरुन इंजिन मागवण्यात आलं. हे इंजिन पॅसेंजर गाडीला जोडताना गाडीवर जोरदार आदळलं आणि पॅसेंजरमधील प्रवाशी एकमेकांवर धडकले. त्यामुळे 40 प्रवासी जखमी झाले आहे. सातोना गावातील नागरिकांनी तातडीनं धाव घेत जखमींना सेलू आणि परतूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close