‘सध्यातरी पेट्रोल स्वस्त होणार नाही’

May 25, 2012 1:02 PM0 commentsViews: 3

'पेट्रोल स्वस्त होणार नाही'25 मे

पेट्रोलच्या दरवाढीवर ताबडतोब कोणताच तोडगा नाही, भारतातल्या तेल कंपन्यांवर दुहेरी संकट आलंय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरली आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर भडकले आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली आहे सध्यातरी पेट्रोल दरवाढ मागे घेणं अशक्य आहे असे संकेत खुद्द पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी दिले आहे. तसेच जयपाल रेड्डी यांनी पेट्रोलच्या दरवाढीचं समर्थन केलंय. अजून काही दिवस सरकार परिस्थितीची पाहणी करणार आहे असं रेड्डी यांनी सांगितलंय.

आंतरराष्ट्रीय बाजार रुपयाची झालेली घसरण त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून वाट पाहुन असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांनी 7.50 रुपयांची दरवाढ करुन सर्वसामान्यांना जोर का झटका दिला आहे. अगोदरच वाढलेल्या महागाईत पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला आहे. देशभरात पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलनं केली जात आहे. पेट्रोलच्या किंमतीत 2 ते 3 रुपये कमी करण्यात यावे अशी मागणीही काँग्रेसने केली. यासंदर्भात तुर्केमेनिस्तानच्या दौर्‍यावरुन परतलेले पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डींनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींची भेट घेतली.

या भेटीमुळे पेट्रोलची अंशत: दरवाढ कमी होणार असल्याची शक्यता होती पण रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्या तरी दरवाढ मागे घेतली जाणार नसल्याचं स्पष्ट करुन टाकलं. आज आंतराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाला सर्वात कमी नीचांकी भाव मिळाला आहे.क्रुड तेलाचे दर गगनाला भिडले आहे अशा परिस्थिती पेट्रोल कंपन्यांनी दरवाढ केली आहे. दररोज पेट्रोल कंपन्यांना यामुळे कोट्यावधींचा फटका बसत आहे. त्यामुळे तेलाची दरवाढ आताच मागे घेतली जाणार नाही, असे संकेत त्यांनी दिलेत. काँग्रेसनं दरवाढ कमी करण्याच्या मागणी केलीय या प्रश्नावर काँग्रेस हासुद्धा एक राजकीय पक्ष आहे, आणि जनतेला न आवडणार्‍या निर्णयांना विरोध करणं, हे राजकीय पक्षाचे काम आहे पण आजची परिस्थिती पाहता दर कमी करणे शक्य नाही. या परिस्थितीचा सरकार काही दिवस पाहणी करणार आहे त्यांनंतर काही उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन रेड्डी यांनी दिलं.

close