वाळूमाफियांकडून पोलीस हवालदारांना बेदम मारहाण

May 24, 2012 2:26 PM0 commentsViews: 1

24 मे

अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातल्या टाकळीमीया गावात वाळूमाफियांनी दोन पोलिसांना बेदम मारहाण केली. प्रवरा नदीतून अवैध वाळू वाहतूक करणार्‍या दोन ट्रॅक्टर्सना देवळालीचे पोलीस हवालदार गाडेकर आणि जाधव यांनी पकडलं. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेण्याची तयारी करत असताना आणखी वाळू माफिया त्याठिकाणी जमा झाले आणि त्यांनी गाडेकर आणि जाधव यांना वाळू भरण्याच्या फावड्यानंच बेदम मारहाण केली. त्यांनतर तस्करांनी ट्रॅक्टर घेऊन पोबारा कला. दोन्ही हवालदारांना उपचारासाठी राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मारहाण करणार्‍या वाळू माफियांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी एक ट्रॅक्टर आणि मोटारसायकलसह दोघांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

close