फरार डॉ.मुंडे पती-पत्नीच्या अटकेचे आदेश

May 25, 2012 2:57 PM0 commentsViews: 16

25 मे

फरार असलेल्या डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे यांना कोर्टाने आज आणखी एक दणका दिला. महसूल, आरोग्य आणि पोलीस यंत्रणेपाठोपाठ न्यायालयानेही कारवाईचा बडगा उगारलाय. त्यामुळे पोलिसांपुढे शरण येण्याखेरीज डॉक्टर मुंडे दाम्पत्यासमोर आता दुसरा कुठलाच पर्याय नाही.

डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे हे गेले 4 दिवस फरार आहेत. गेली 25 ते 30 वर्ष परळीमधल्या याच हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्वत:चं प्रस्थ निर्माण केलं होतं. गर्भलिंग निदानासाठी जिथं रांगा लागायच्या त्याच हॉस्पिटलमध्ये आता कोर्ट आणि कलेक्टरच्या नोटीस झळकत आहे. पोलिसांनीही आता मुंडे विरोधात अंबाजोगाई कोर्टात धाव घेतलीय. आरोपी मुडेंना अटकपूर्व जामीन देऊ नये, असा अर्जच त्यांनी न्यायालयात केला.यापाठोपाठ अंबाजोगाई कोर्टाने दुपारी मुंडे दाम्पत्याचा 2010 च्या एका खटल्यातला जामीनही रद्द केला आणि मुंडे पती-पत्नीच्या अटकेचे आदेशच काढले. मुलींचा मारेकरी असलेल्या डॉक्टर मुंडेंचा खोटारखेडपणा पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनही उघड झाला आहे. डॉ. मुंडेंची बाजू मांडण्यासाठी त्यांचा मुलगा किंवा वकील कुणीही कोर्टात हजर नव्हते. राजाश्रय गेल्यामुळेच मुंडे पती-पत्नीला आता पोलिसांना शरण येण्याशिवाय गत्यंतर नाही.

डॉक्टर सुदाम मुंडेंनी कुठल्या-कुठल्या कायद्यांचा भंग केलाय आणि त्यांच्यावर आता कुठल्या कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते ?

कारवाईचा बडगा

- MTP (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी) अंतर्गत गुन्हा दाखल- PCPNDT (गर्भलिंगनिदान विरोधी कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल- हॉस्पिटल इमारतीच्या बांधकाम परवान्याबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांतर्फे चौकशी- पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत येणार्‍या बायोमेडिकल वेस्ट नियमांचंही उल्लंघन- बॉम्बे नर्सिंग ऍक्टचा भंग- मेडिकल काऊन्सिलकडे डॉक्टरकीची नोंदणी रद्द करण्याची शिफारस- सामाजिक शांतता भंग करण्याचा गुन्हा दाखल

close