तलवार दाम्पत्यावर आरोप निश्चित

May 24, 2012 5:36 PM0 commentsViews: 6

24 मे

बहुचर्चित आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडप्रकरणीतील मुख्य आरोपी दुसरे कोणी नसून आरुषीचे आई-वडील राजेश तलवार आणि नुपुर तलवार आहे. दोन दिवस कोर्टात चाललेल्या युक्तिवादानंतर तलवार दाम्पत्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहे. आता तलवार पती-पत्नीवर खटला चालवला जाणार हे निश्चित झालं आहे. या दोघांवरही हत्या, हत्येचा कट, तपासात पोलिसांना असहकार्य करणे आणि पुरावे नष्ट करणे हे आरोप निश्चित करण्यात आले आहे. दोघांवरही उद्या अधिकृतपणे गुन्हे दाखल होतील.

close