डॉक्टराला शिक्षा करणे पाकला पडले महागात

May 25, 2012 4:46 PM0 commentsViews: 3

25 मे

ओसामा बिन लादेनला पकडण्यात मदत करणार्‍या सरकारी डॉक्टरला पाकिस्तान सरकारनं तुरुंगात डांबलंय. यामुळे नाराज झालेल्या अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर शकील आफ्रिदी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली 33 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीत दरवर्षी 10 लाख डॉलर्स याप्रमाणे 33 वर्षात 3 कोटी 30 लाख डॉलर्सची कपात करणार असल्याचं अमेरिकेनं ठरवलं आहे. डॉक्टर शकील यांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी अमेरिकेची मागणी आहे.

close