एनआरआय दाखवतायत भारतीय बँकांवर विश्वास

November 25, 2008 5:34 AM0 commentsViews: 5

25 नोव्हेंबर, जालंधरनरेश अरोरामंदीच्या लाटेनं एनआरआय व्यक्तींचा परदेशी बँकांवरचा विश्वासही उडालाय. युरोप आणि अमेरिकेतील बँका दिवाळखोर होण्याच्या भीतीने कित्येक अनिवासी भारतीयांनी त्यांचे पैसे भारतीय बँकामध्ये जमा करायला सुरुवात केली आहे. विशेषत: पंजाबमधल्या बँकामध्ये एनआरआय डिपॉझिट्समध्ये वाढ झाली आहे.जालंधर मधील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत जवळजवळ दहा हजार पेक्षा जास्त अनिवासी भारतीयांची खाती आहेत. डॉलर मजबूत झाल्याने काही दिवसांपासून त्यांच्या खात्यातल्या जमा रक्कमेचं प्रमाणदेखील वाढलंय. मागील वर्षी ऑक्टोबरपर्यंत बँकेत 566 कोटी रुपये जमा झाले होते, तर या वर्षी 600 कोटी रुपये जमा झाले आहेत."जालंधर मधील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत जवळजवळ दहा हजार पेक्षा जास्त अनिवासी भारतीयांची खाती आहेत. डॉलर मजबूत झाल्याने काही दिवसांपासून त्यांच्या खात्यातल्या जमा रक्कमेचं प्रमाणदेखील वाढलंय. मागील वर्षी ऑक्टोबरपर्यंत बँकेत 566 कोटी रुपये जमा झाले होते, तर या वर्षी 600 कोटी रुपये जमा झाले आहेत" अशी माहिती जालंधरच्या मुख्य शाखेचे मॅनेजर गिरीश चंदर पांडे यांनी दिली.अमेरिका आणि युरोपमधल्या बँका दिवाळखोरीत निघाल्याच्या बातम्या आल्यापासून अनिवासी भारतीयांचा भारतीय बॅकांवरचा विश्वास वाढला आहे. रिझर्व बँकेच्या आवाहनानंतर एनआरआय डिपॉझिटस्‌वर काही बँकांनी व्याजदर वाढवलेत. त्यामुळे आता विदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना भारतातल्या बँकांमध्ये पैसे ठेवणं फायद्याचं वाटतंय.

close