अजितदादांच्या वहिनी शर्मिला पवार यांच्यावर गुन्हा दाखल

May 24, 2012 5:11 PM0 commentsViews: 207

24 मे

पुण्यातल्या हिंजवडीजवळच्या महार वतनाची जमीन बळकावल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.पौड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. महार वतनाची 3 एकर 18 गुंठे जमीन लाटण्यासाठी बनावट आदेश तयार करून फसवणूक केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी बर्‍हाटे यांनी केला होता. याप्रकरणी जिल्हाधिका-यांनी पौडच्या पोलिसांना शर्मिला पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात महार वतनाची जमीन लाटल्याचा आरोप उपमुख्यम्ंात्री अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला श्रीनिवास पवार यांच्यावर आहे. रिहे गावात हिंजवडी आय. टी पार्कजवळ असलेली ही सुमारे 2 एकर जमीन एका हिस्सेदाराला हाताशी धरून लाटण्यात आली, असा आरोप या गावातील रहिवासी गुलाबराव गजरमल यांनी केलाय. या हिस्सेदाराला पैशाची लालूच दाखवून आणि जिल्हाधिकार्‍यांच्या मूळ आदेशात खाडाखोड केल्याचंही गरजमल यांचं म्हणणं आहे.

close