‘यूपीए सरकार म्हणजे ‘निर्मलबाबा का दरबार’

May 25, 2012 5:33 PM0 commentsViews: 8

25 मे

यूपीए सरकारची चुकीची धोरणं आणि घोटाळ्यांमुळे देश आर्थिक संकटात सापडल आहे. भाजपची सत्ता असलेली राज्यं विकासात आघाडीवर आहेत, तर काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात विकास नाही, वीज नाही यांच्याच चुकीमुळे जनतेला सामोरं जावं लागत आहे. दिल्लीत बसलेलं हे सरकार निर्मलबाबा का दरबार आहे असा टोला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच मनमोहन सिंग सरकार कमकुवत असून दहशतवादाला आळा घालण्यात आणि सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही मोदींनी केला. भाजपची मुंबईत सभा मोठ्या दिमखात पार पडली.

अगोदर नाराज मग संजय जोशी यांचा राजीनामा घेऊन 'राजी' झालेले नरेंद्र मोदी राष्ट्रीय कार्यकरणीला हजर झाले. आज मुंबईतील परळ येथे झालेल्या सभेत मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. इंदिरा गांधींच्या कारभारापासून ते आजपर्यंतच्या काँग्रेसच्या कारभारावर कडाडून टीका केली. दिल्लीत बसलेलं सरकार म्हणजे निर्मलबाबाचा दरबार आहे असा टोला लगावला. तसेच सध्या पेट्रोलच्या दरवाढीसाठी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याचे कारण दिले जात आहे पण हे सगळं खोटं आहे यामागे षडयंत्र आहे याबद्दल पंतप्रधानांना खुलासा केला पाहिजे. आजपर्यंत यांनी 16 वेळेस पेट्रोल दरवाढ केली. प्रत्येकवेळा यांच्या चुकीच्या धोरणामुळे जनतेला मोठी किंमत मोजावी लागली आहे. सध्या राज्यात पडलेला दुष्काळ हा यांच्या कारभारामुळे पडला आहे. सिंचन प्रकल्पात कोटींचे घोटाळे केल्यामुळे आज ही प्रकल्प रखडलेली आहे. त्यामुळे जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. केंद्रात ही यांच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. कोणतेचं धोरण नीट राबवले जात नाही. त्यामुळे जनतेची फसवणूक होतं आहे असा आरोप मोदी यांनी केला. यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी येणार्‍या 2014 च्या निवडणुकीत भाजपची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे काल पर्यंत एकमेकांवर नाराज असलेले पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी दोघंही एकत्र आले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पण पक्षातील जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज मात्र या सभेला उपस्थित नसल्यामुळे नाराज चर्चा रंगली. पण पक्षात नाराजी नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय.

close