दिल्लीला लोळवत, चेन्नई फायनलमध्ये

May 25, 2012 6:02 PM0 commentsViews: 1

25 मे

महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जनं इतिहास रचलाय. सलग तिसर्‍यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईनं धडक मारली आहे. चेन्नईनं दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव करत चेन्नईनं फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि आता फायनलमध्ये चेन्नईची गाठ आहे ती कोलकाता नाईट रायडर्सशी.. त्यामुळे विजयाची हॅट्‌ट्रीक करण्यापासून चेन्नईची टीम आता फक्त एक पाऊल दूर आहे.

आज झालेल्या मॅचमध्ये मुरली विजयची सेंच्युरी आणि बॉलर्सनं केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 86 रन्सनं धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली. दिल्लीचा कॅप्टन वीरेंद्र सेहवागनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि ही चूक त्याला चांगलीच महागात पडली. चेन्नईच्या बॅट्समननं आक्रमक बॅटिंग करत 222 रन्सचा डोंगर उभा केला. मुरली विजयनं 113 रन्स केले. तर मायकेल हसी, धोणी आणि ड्वेन ब्राव्होनं त्याला चांगली साथ दिली. विजयाचं हे बलाढ्य आव्हान दिल्लीला पेलवता आलं नाही. महेला जयवर्धनेनं एकाकी झुंज दिली खरी पण त्याला इतर बॅट्समनची साथ मिळाली नाही. डेव्हीड वॉर्नर आणि वीरेंद्र सेहवागला तर रन्सचा दुहेरी आकडही गाठता आला नाही. दिल्लीची टीम 20 ओव्हरमध्ये 136रन्सवर ऑलआऊट झाली. चेन्नईतर्फे आर अश्विननं सर्वाधिक 3 तर जकातीनं 2 विकेट घेतल्या. आता फायनलमध्ये चेन्नईची गाठ आहे ती कोलकाता नाईट रायडर्सशी. चेन्नई विजयाची हॅट्‌ट्रीक करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. चेन्नईने जर फायनल जिंकली तर चेन्नईच्या नावावर एक इतिहास रचणार हे नक्की.

close