पेट्रोल दरवाढ अंशत:मागे ?

May 25, 2012 9:41 AM0 commentsViews: 2

25 मे

पेट्रोलची 7 रुपये 50 पैसे इतकी घसघशीत दरवाढ झाल्यानंतर आता ही दरवाढ अंशतः मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. वाढत्या दबावानंतर आज पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डींनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली. त्यानंतर ते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधींना या निर्णयाबाबत माहिती नव्हती, असं सागण्यात येतंय. तसेच जेव्हा हा निर्णय घेण्यात आला, तेव्हा जयपाल रेड्डी हे तुर्केमेनिस्तानच्या दौर्‍यावर होते. त्यामुळे आज सोनिया गांधींबरोबर होणार्‍या बैठकीत काय होतं हे बघावं लागेलं. तसेच डिझेल आणि एलपीजीच्या किंमती लगेचं वाढवल्या जाणार नाही असंही सांगण्यात येतंय.

close