सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

May 26, 2012 10:06 AM0 commentsViews: 3

26 मे

बार्शी येथे हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्यानं सोनाली प्रदीप शिंदे या विवाहीतेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनालीच्या वडीलांनी तक्रार दाखल केल्यानंतर तीचा नवरा प्रदीपसह सासरच्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या चौघांना कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवाना केली आहेत. सोनालीचा पती प्रदीप हा बंगलोरला एका खाजगी शाळेत शिक्षक आहे. बंगलोरला राहण्याचा खर्च परवडत नसल्यानं माहेरून 1 लाख रुपये आणण्यासाठी सोनालीला प्रदीपसह त्याच्या आई-वडील आणि बहिणीनं वारंवार जबरदस्ती करुन छळ केला होता. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून सोनालीनं विष पिऊन आत्महत्या केल्याची तक्रार सोनालीच्या वडीलांनी दाखल केली आहे.

close