ओबामा नवं बेलआउट पॅकेज देणार

November 25, 2008 5:38 AM0 commentsViews: 2

25 नोव्हेंबरअमेरिकेचे नवे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी पंचवीस लाख नोकर्‍या देण्याचं जाहीर केलं होतं. आता त्यांनी एक नवे बेलआऊट पॅकेज आणण्याचा विचार जाहीर केलाय. पुढच्या दोन वर्षी सातशे अब्ज डॉलर्सचं पॅकेज देण्याची ओबामांची तयारी सुरू आहे. या प्लॅनला मंजुरी मिळाली तर ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी मदत असेल. याआधी निवडणूक जिंकल्या जिंकल्या ओबामांनी 2011पर्यंत बांधकाम क्षेत्रात 25 लाख नोकर्‍या देण्याचं जाहीर केलं होतं.दरम्यान ब्रिटन सरकारनेही आपली अर्थव्यवस्था सावरायला पावलं उचलली आहेत. ब्रिटन सरकारने वीस अब्ज पाऊंडच्या पॅकेजची घोषणा केली आहे. यानुसार वॅट अडीच टक्के कमी कऱण्यात आला आहे. तर जास्त उत्पन्न असलेल्यांवर 45 टक्के इन्कम टॅक्स लावण्यात आला आहे. ब्रिटनचं हे पॅकेज देशाच्या जीडीपीच्या सुमारे एक टक्के आहे.

close