मुंबईत मध्य रेल्वेवर प्लास्टिक बंदी

May 26, 2012 10:20 AM0 commentsViews: 45

26 मे

मुंबईत मध्य रेल्वेवर आता प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. प्लास्टिकमुळे होणारा कचरा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं आता प्लास्टिक कव्हरमधल्या, काही खाद्य पदार्थांना प्लॅटफॉर्मवर विकायला बंदी घातली आहे आहे. बिस्कीट ,चिप्स, नमकीन अशा पदार्थांना बंदी घातली जाणार आहे. उपनगरीय 76 स्टेशन आणि बाकीची 1 लाख स्टेशनवर बंदी घातली जाणार आहे. यासंदर्भात सर्व स्टॉलधारकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय मध्य रेल्वेकडून स्टॉलविक्रेत्यांचं कॉन्सिलिंग केलं जाणार आहे.

close