मुंबईत भाजपचं मंथन

May 25, 2012 11:36 AM0 commentsViews: 5

25 मे

मुंबईत सुरु असलेली भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी भाजपच्या सर्व नेत्यांनी हजरी लावली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा आज या बैठकीत सहभागी झाले. येडीयुरप्पांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी थेट पाठिंबा दिला आहे. तर काल गुरुवारी संजय जोशी यांची विकेट घेतल्यानंतर दाखल झालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय कार्यकारिणीत भाषण करणार आहेत. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मात्र उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे अडवाणी नाराज असल्याची चर्चा आहे. पण अडवाणी नाराज नाहीत असं भाजपनं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे नितीन गडकरी यांची दुसर्‍यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे पक्षात नाराजी असल्याची कुजबुज सुरु आहे. पण असं काही नसल्याचं दावा निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

close