धरण उशाला, कोरड घशाला !

May 26, 2012 11:43 AM0 commentsViews: 5

रायचंद शिंदे, जुन्नर

26 मे

पुणे जिल्ह्यात पाच धरणांचा मिळून सर्वात मोठा धरण प्रकल्प जुन्नर तालुक्यात आहे. पण उन्हाळा सुरु झाला की, ही सगळी धरणं कोरडी पडतात. या प्रकल्पाच्या कामात अनेक चुका झाल्यानं त्याची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागतेय. शिवाय पुनर्वसनाचं काम लालफितीत अडकल्यानं प्रकल्पग्रस्तांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय.

कुकडी प्रकल्पातल्या पाचपैकी एक असलेलं पिंपळगाव-जोगा धरण.. 1991-92 मध्ये या धरणाचं काम सुरु झालं आणि 2000 साली त्यात पाणी साठायला सुरुवात झाली. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. धरणातला मृत पाणीसाठा राजकारणी आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने टनेलद्वारे नदीपात्रात सोडलं जातं. ग्राहक पंचायतीनं याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

इथल्या प्रकल्पासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रीया पूर्ण न करता सरकारनं जुन्नर ते पारनेर परिसरातल्या हजारो शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. जमिनीचं भाडं आणि वाढीव दराच्या रक्कमा मिळण्यासाठी आता लोकांना कोर्टाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

जुन्नर तालुक्यात वडज, माणिकडोह, पिंपळगाव-जोगे, येडगाव, तर आंबेगाव तालुक्यात डिंभा ही एका ओळीत पाच धरणं आहेत. यापैकी डिंभा पूर्म क्षमतेनं भरतं. याच धरणाच्या जीवावर इतर 4 धरणात पाणी सोडून ते सिंचनाला वापरले जातं. पण पूर्वी झालेल्या चुकांचा फटका मात्र इथल्या लाभधारकांना पुढची अनेक वर्ष त्यांना सहन करावा लागणार आहे.

close