केजरीवाल मनमानी करतात – शिवेंद्र सिंग

May 26, 2012 11:46 AM0 commentsViews: 1

26 मे

टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल हे इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेला स्वत:ची मालमत्ता समजतात असा आरोप आयएसीच्या सोशल मीडिया साभाळणारे शिवेंद्र सिंग यांनी केला आहे. प्रशांत भूषण यांच्या घरी मागच्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर शिवेंद्र यांनी अशा आशयाचे पत्र पाठवले आहे. अरविंद केजरीवाल मनमानी करतात आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळेस स्वताच्या मर्जीने अनेक गोष्टी त्यांनी केल्याचा आरोपही शिवेंद्र सिंग यांनी केला आहे. या पत्रामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

close