घरकुल योजनेचे वाजले बारा !

May 26, 2012 1:32 PM0 commentsViews: 22

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड

26 मे

''बेस्ट सिटी ''चा ऍवार्ड मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेनं, मोठा गाजा-वाजा करत राबवलेल्या ''घरकुल'' योजनेचं पितळ आता उघड पडलं आहे. गेल्या 3 वर्षांपासून या ना त्या कारणामुळे रखडलेली ही योजना, कोणत्याही धोरणा शिवाय राबवली जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पिंपरी-चिंचवड परीसरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी, महापालिकेनं राबवलेली ही योजना आहे. महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या योजनेतील लाभधारकांना आत्तापर्यंत त्यांच्या हक्काची घरे मिळणं अपेक्षित होतं. पण ती अजुनही न मिळाल्यानं लाभधारक मेटा-कुटीला आले आहेत. तर योजनेत भ्रष्टचार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

महापालिकेकडून होणार्‍या याच, विलंबाच कारण शोधण्यासाठी ,पिंपरीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल विनोदे यांनी महापालिकेकडे माहितीच्या अधीकारात माहिती मागवली असता, त्यांना जी माहिती देण्यात आली ,ती धक्कादायक होती. या सर्व प्रकारा बाबत महापौरांना विचारलं असता, या योजनची धेारण आखण्यासाठी आपण नविन आयुक्त येण्याची व एनओसी (NOC) मिळवण्याची वाट पाहत असल्याच संतापजनक वक्तव्य केलं.

एकंदरच काय तर, पिंपरी-चिंचवड महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करुन राबवत असलेल्या या योजणचे भवितव्य अंधकारमय असल्याचं आता स्पष्ट झालाय, स्वत:ला कठोर प्रशासक म्हणवणार्‍या परदेशींनी नुकतीच या पालिकेच्या आयुक्तपदीची सुत्र स्विकारली. आता या प्रकाराकडे त्यांनीच लक्ष घालावं अशी मागणी नागरीकांनी केली आहे. नाहीतर दिव्या खाली अंधार असच म्हणावं लागेल.

close