दरवाढीविरोधात द्रमुकनं दिली तामिळनाडू बंदची हाक

May 27, 2012 11:36 AM0 commentsViews: 1

27 मे

पेट्रोलच्या दरात 7.50 रुपयांची विक्रमी वाढ केल्यामुळे देशभरात विरोधी पक्षांनी ठिक-ठिकाणी आंदोलन करुन निषेध व्यक्त केला आहे. पेट्रोल दरवाढीविरोधात डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यापाठोपाठ आता यूपीएचा घटक पक्ष असलेला द्रमुकही पेट्रोल दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. द्रमुकनं 30 मे रोजी तामिळनाडू बंदची हाक दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी स्वत: चेन्नईत होणार्‍या आंदोलनात सहभागी होतील. पेट्रोलची दरवाढ अंशत: तरी मागे घेण्यात यावी अशी मागणी करुणानिधी यांनी केली आहे.

close