‘हा टीम अण्णाला तोडण्याचा प्रयत्न’

May 26, 2012 1:47 PM0 commentsViews: 4

26 मेअरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातील किरण बेदींच्या कथीत पत्राची बातमी खोटी आहे. हा टीम अण्णाला तोडण्याचा प्रयत्न आहे असा आरोप जेष्ठ समाज अण्णा हजारे यांनी केला आहे. केजरीवाल यांच्या संदर्भात किरण बेदी यांनी मला कोणतंही पत्र लिहिलं गेलेलं नाही. हा सगळा आमच्याविरोधात खोटा प्रचार सुरु आहे असंही अण्णांनी म्हटलंय.

जनलोकपाल विधेयकासाठी एकत्र आलेल्या टीम अण्णांवरआजपर्यंत झालेल्या आरोपात आज आणखी एका आरोपाचा भर पडला. किरण बेदी यांनी अरविंद केजरीवाल हे स्वत:च्या एनजीओ (NGO) ला आलेल्या देणग्यांचा योग्य वापर करत नाही, अशी तक्रार करणारा ई-मेल किरण बेदींनी अण्णा हजारेंना पाठवला होता. अशी बातमी आज एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापण्यात आली. याबद्दल अण्णांनीही केजरीवाल यांना पत्र लिहले असं या बातमीत छापण्यात आलं आहे. पण किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांनी या बातमीचं खंडन केलं आहे. आपल्या सदस्यांची पाठ राखन करत अण्णांनीही ही बातमी चुकीची असल्याचा दावा केला आहे. आजपर्यंत टीम अण्णाला नेहमी तोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यातला हा एक प्रकार आहे. असे कोणतेही पत्र केजरीवाल यांनी मला लिहले नाही असा खुलासा अण्णांनी केला.

close