म्यानमारच्या लोकशाहीच स्वागत – पंतप्रधान

May 27, 2012 11:41 AM0 commentsViews: 5

27 मे

पंतप्रधान मनमोहन सिंग आज तीन दिवसांच्या म्यानमार दौर्‍यावर रवाना झाले आहेत. राजीव गांधी यांच्यानंतर म्यानमार दौर्‍यावर जाणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. म्यानमारमध्ये नव्याने स्थापन होत असलेल्या लोकशाही व्यवस्थेचं स्वागत करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. म्यानमारशी व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यावर पंतप्रधानांचा भर असेल. ते यांगूनमध्ये म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, आयबीएन नेटवर्कच्या हाती म्यानमारच्या लष्कराची गोपनीय कागदपत्रं लागली. त्यानुसार चीनच्या प्रभावाला कमी करण्यासाठी भारताशी संबंध दृढ करण्यासाठी म्यानमार उत्सुक आहे.

close