पुण्यात मिडपॉईंट हॉस्पिटलला आग

May 26, 2012 2:45 PM0 commentsViews: 11

26 मे

पुण्यातल्या औंध परिसरातील मिडपॉईंट हॉस्पिटलमध्ये आज सकाळी 10 च्या सुमारास आग लागली होती. या घटनेत हॉस्पिटलचा चवथा माळा पुर्ण पणे जळून खाक झाला आहे. चवथ्या माळ्यावर जवळपास 36 रुग्ण दाखल होते. मात्र फायर ब्रिगेडचे जवान आणि आजबाजूच्या नागरिकांनी वेळीच धाव घेत या रुग्णांना इमारतीतून बाहेर काढलंय. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीच नेमकं कारण अद्यापही कळू शकलेल नाही. लोड शेडिंग असल्यामुळे फायर यंत्रणा सुरु झाली नसल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनानं केला आहे.

close