अखेर ‘सीना-कोळेगाव’चं पाणी सोलापूरला सोडलं

May 27, 2012 1:01 PM0 commentsViews: 3

27 मे

उस्मानाबादमधल्या सिना-कोळेगाव धरणातलं पाणी सोलापूरसाठी सोडायला अखेर सुरुवात झाली आहे. कडक पोलीस बंदोबस्तात धरणाचं पाणी सोडण्यात येतंय. धरणाचे चार दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन दरवाजे सध्या उघडले आहे. शनिवारी या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोलापूरला पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.आज धरण परिसरात आंदोलन करणार्‍या आमदार राहुल मोटे यांच्यासह पोलिसांनी 200 शेतकरी आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्याविरोधात आता औरंगाबाद- सोलापूर हायवेवर आंदोलन करण्यात येतंय. दोन तासांपासून हा रस्ता आंदोलकांनी अडवून धरलेला आहे. या धरणाचं पाणी सोलापूरला द्यायला उस्मानाबादकरांचा तीव्र विरोध आहे.

close