पैशासाठी पोटच्या मुलीची विक्री करणार्‍या मातेस अटक

May 26, 2012 3:05 PM0 commentsViews: 11

26 मे

पैशासाठी पोटच्या मुलीची विक्री करणार्‍या मातेस वाशीममध्ये अटक करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे या मातेनं 18 वर्षाच्या मुलीला केवळ 60 हजार विक्री केली आणि या कामी तीन मुलांची मदतही घेतली. अखेर मुलीच्या तक्रारीवरुन या महिलेला अटक करण्यात आली. सदर महिलेचं नाव मीनाताई वाकोडे आहे. या महिलेनं आपल्या मुलीला पनवेल इथं राहणार्‍या एका युवकाला 60 हजार रुपयात विकलं. त्यानंतर तिने राजस्थानमधल्या नागौर जिल्हातील एका युवकासोबतही मुलीचा 1 लाखात सौदा करण्याची बोलणी करुन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.सेलुबाजार मार्गावर सापडलेला अनोळखी मृतदेह आपल्या मुलीचाच असल्याचा दावा करुन या महिलेनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर खर प्रकरण पुढ आला.

close