अखेर जगन मोहन रेड्डींना अटक

May 27, 2012 2:50 PM0 commentsViews: 3

27 मे

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयनं वाय. एस. आर. काँग्रेस अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांना अखेर अटक झाली आहे. गेले तीन दिवस त्यांची चौकशी सुरू होती. आज संध्याकाळी सव्वा सात वाजता त्यांना अटक झाली. उद्या सकाळी त्यांना कोर्टात हजर केली जाईल. जगन मोहन यांच्या अटकेनंतर ताबडतोब हैदराबादमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या बसेसलाही डेपोमध्ये पाठवण्यात आलंय. जगन मोहन यांच्या अटकेनंतर आंध्र प्रदेशात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सर्व काळजी घेत आहेत. हैदराबादसह राज्यातल्या कडप्पासारख्या सर्वच संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहेत. दरम्यान, राजकीय आकसापोटी सीबीआय आपल्याविरोधात काम करत असल्याचा आरोप जगन मोहन यांनी केला. आंध्रप्रदेशात होणार्‍या पोटनिवडणुकीत प्रचार करता येऊ नये, यासाठी आपल्याविरोधात रचलेला हा कट आहे, असंही जगन मोहन यांनी म्हटलंय. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणात गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये जगनमोहन यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.

close