‘त्या’ चारही मुलींच्या शिक्षणाची सुप्रिया सुळेंनी घेतली जबाबदारी

May 27, 2012 3:26 PM0 commentsViews: 42

27 मे

परळीमधल्या डॉ. मुंडे हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर यांचा गर्भपातावेळी मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांच्या पतीला अटक झाली आहे. या सर्व प्रकारामुळे पटेकर यांच्या 4 मुली आता अनाथ झाल्या आहेत. या मुलींची व्यथा आयबीएन लोकमतनं मांडल्यानंतर आता त्यांच्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंनी मदतीचा हात दिलाय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या 4 मुलींच्या शिक्षणाची आणि आरोग्याची जबाबदारी उचलणार आहे. जागर हा जाणीवांचा या उपक्रमांतर्गत त्यांना मदत केली जाणार आहे. त्यासाठी प्रतिष्ठाणचे सदस्य निलेश राऊत यांनी आज या गावाला भेट दिली आणि या संबधीचं पत्र या मुलींच्या आजीला दिलं.

close