उस्मानाबादमध्ये सोलापूरला पाणी देण्याच्या निषेधार्थात बंद

May 28, 2012 8:00 AM0 commentsViews: 8

28 मे

सिना कोळेगाव धरणाचं पाणी सोलापूरला सोडण्याची प्रक्रीया कालचं सुरु झाली. मात्र उस्मानाबादकरांचा विरोध अजूनही मावळलेला नाही. पाणी देण्याच्या निषेधार्थात आज उस्माबाद जिल्हातील भूम, परांडा, वाशी आणि उस्मानाबाद तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येतोय. भूम इथ गोलाई चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. तर परांडा तालुक्यातही आंदोलन करण्यात आलं आहे. काल पोलिसांनी पाणी सोडण्याला विरोध करणार्‍या 200 शेतकरी आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामध्ये आमदार राहूल मोटे, सुजित सिंह ठाकूर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा समावेश आहे.

close