‘डोन्ट वरी’ सध्यातरी डिझेल,सिलेंडरची दरवाढ नाही !

May 28, 2012 12:45 PM0 commentsViews: 8

28 मे

पेट्रोलच्या दरात विक्रमी वाढ केल्यानंतर डिझेल,केरोसीन आणि घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ करण्याचे संकेत सरकारने दिले होते. मात्र, सध्यातरी कोणतीच दरवाढ करणार नसल्याचं पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डींनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्यातरी सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मागिल आठवड्यात आंतराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण झाल्यामुळे पेट्रोलच्या दरात 7.50 पैशांची वाढ करण्यात आली. पेट्रोल पाठोपाठ डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करु द्यावी असा प्रस्ताव पेट्रोलियम कंपन्यांनी सरकारकडे सादर केला होता. पेट्रोलच्या दरात वाढ झाल्यामुळे देशभरात एकच संतापाची लाट उसळली. पेट्रोलच्या दरात दोन ते तीन रुपयाने कपात करुन डिझेलच्या दरात वाढ करण्याची शक्यता होती मात्र सरकारने कोणत्याही परिस्थिती पेट्रोलचे दर कमी होऊ शकत नाही असं स्पष्ट केलं. मात्र दरवाढ जरी टळली असली तर दरवाढीची धास्ती कायम असणार आहे.

close