नॅनोला गुजरात प्रदूषण मंडळाची परवानगी

November 25, 2008 9:51 AM0 commentsViews: 8

25 नोव्हेंबर, गुजरातजमशेदपूर प्लान्ट बंद ठेवायला लागत असला तरी टाटांच्या नॅनो प्रकल्पाची गाडी ,आता गुजरातमध्ये फास्ट ट्रॅकमध्ये धावायला लागलीय. टाटांच्या या एक लाखांच्या छोट्या कारच्या प्रकल्पाला सिंगूर प्रकरणात ब्रेक लागला होता. नॅनो प्रकल्पाला गुजरात प्रदूषण मंडळानं ना हरकत प्रमाणपत्र दिलंय. त्यामुळे टाटा ग्रुप साणंदमधल्या जमिनीवर कारखान्याचं बांधकाम सुरू करु शकणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या राजकिय शिताफीमुळे टाटांचा हा महत्वांकांक्षी नॅनो प्रकल्प गुजरातेत वळवण्यात ते यशस्वी ठरले होते. त्यानंतर नॅनो प्रकल्पासाठीच्या या जमिनीवर कंपांऊडचं बांधकामही सुरू झालं होतं.

close