अभिनव महाविद्यालय सुरुच राहणार !

May 28, 2012 11:49 AM0 commentsViews: 1

28 मे

अखेर पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय सुरुच राहणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश अर्ज विक्रीला आजपासून सुरवात करण्यात आली आहे. मागिल महिन्यात महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात सामाजिक संघटनांनी आंदोलन पुकारले होते. अखेर आपला निर्णय मागे घेत अभिनव कला महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षासाठी बंद होणार नसल्याची माहिती संस्थेचे सचिव भालचंद्र पाठक यांनी दिली आहे. गरीब विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, सरकार यापुर्वी महाविद्यालय बंद करायला तयार झालं होतं. मात्र नंतर सरकारने घुमजाव केलं. तसेच समिती बाबतची गोपनीय कागदपत्र भारतीय विद्यार्थी सेनेच्या मनीषा धारणेंना दिली. याबाबत कोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या बाबतीत तक्रार करण्यार असल्याचंही त्यांनी जाहिर केलंय.

close