कोलकाता ‘रायडर्स’ची उद्या भव्य मिरवणूक

May 28, 2012 12:00 PM0 commentsViews: 1

28 मेकोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएलच्या पाचव्या हंगामाचं जेतेपद पटकावलं आहे. आणि त्यानंतर सध्या पश्चिम बंगालमध्ये विजयोत्सव सुरु आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने तर विजयी खेळाडूंची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि या मिरवणुकीत शाहरुख खानसुध्दा सहभागी होणार आहे. उद्या अकरा ते एक या वेळेत ही विजयी मिरवणूक निघणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर या मिरवणुकीचा शेवट होईल तो इडन गार्डन्सवर मैदानावर. यावेळे ईडन गार्डन्सवर एका भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं आहे. काल रविवारी कोलकाताने चेन्नईला हरवून आपण आयपीएलचे किंग ठरले आहे.

close