जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचे सामुहिक मुंडन

May 29, 2012 11:19 AM0 commentsViews: 11

29 मे

जळगावमध्ये गेल्या 17 दिवसांपासून जातवैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी कोळी समाजाचं आंदोलन अजूनही सुरुच आहे. रास्तारोको, रेलरोको केल्यानंतरही सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत कोळी समाजानं मुंडन करुन सरकारचा दशक्रिया विधी केला. आदिवासी,महादेव, मल्हार, टोकरे आणि कोळी जात प्रमाणपत्रावरुन सरकार समाजाला अडचणीत आणत असल्याचा आरोप या आंदोलकांचा आहे. सरकारनं तातडीनं दखल घेतली नाही तर राज्यभर रेल रोको करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

close