आदर्श प्रकरणी संरक्षण खात्याची सरकारला नोटीस

May 29, 2012 11:25 AM0 commentsViews: 1

29 मे

आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात महाराष्ट्र सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. ज्या जमिनीवर आदर्शची इमारत उभी आहे ती संरक्षण मंत्रालयाचीच आहे, अशी नोटीस संरक्षण मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवली आहे. ही जमीन राज्य सरकारची असल्याचा राज्य सरकारचा दावा खोटा असल्याचंही नोटिशीत म्हटलं आहे. राज्य सरकारनं दोन महिन्यात जागा संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात द्यावी असंही या नोटीशीत सांगितलं आहे. राज्य सरकारनं जागा परत केली नाही तर संरक्षण मंत्रालय हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

close