इंजिनिअरिंगसाठी आता एकच प्रवेश परीक्षा

May 28, 2012 12:34 PM0 commentsViews: 3

28 मे

इंजिनिअरिंग करण्याची स्वप्न पाहणार्‍या तमाम विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा भार सरकारने आज कमी केला आहे. यापुढे इंजिनिअरिंग कॉलेजेस, IIT, NIT आणि IIIT (इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेज) आणि इंजिनिअरिंगच्या सर्व केंद्रीय संस्थांसाठी आता यापुढे एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी केली. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2013 पासून हा निर्णय लागू होणार आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के मार्क्स हे 12 वीच्या परीक्षेतील तर 50 टक्के मार्क्स प्रवेश परीक्षेतून धरले जातील. IIT, NIT आणि IIIT च्या विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के मार्क्स हे 12 वीच्या परीक्षेतील गृहीत धरले जातील. तर 30 टक्के मार्क्स हे मुख्य प्रवेश परीक्षेतले धरले जातील. आणि उर्वरित 30 टक्के मार्क्स हे ऍडव्हान्स्ड टेस्टमधून मोजले जाणार आहे आणि परीक्षा ती एकाच दिवशी होईल.

close