अखेर तिवारी यांची डीएनए टेस्ट होणार

May 29, 2012 1:26 PM0 commentsViews: 2

29 मे

काँग्रेसचे नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांची अखेर डीएनए (DNA) टेस्ट होणार आहे. आज सकाळी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज सकाळी डेहराडूनमध्ये तिवारी यांच्या घरात डॉक्टरांनी रक्ताचे नमुने घेतले. यावेळी याचिकाकर्ता रोहित शेखर आणि त्याची आई उज्ज्वला शर्माही उपस्थित होते. तिवारी हे आपले वडील आहेत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी रोहित शेखर यानं केली होती. पण तिवारींनी त्याला सतत नकार दिला होता. अखेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे तिवारींना रक्ताचे नमुने द्यावे लागले. गेल्या चार वर्षांपासून ही न्यायालयीन लढाई सुरू आहे.

close