‘डॉन’ला वानखेडेचं मैदान मोकळं ?

May 28, 2012 2:12 PM0 commentsViews: 4

28 मे

बॉलिवूडचा किंग आणि आयपीएलच्या पाचच्या हंगामात पण 'किंग' ठरलेल्या शाहरुख खानला वानखेडेवरील बंदी उठवण्याची शक्यता आहे. आज याबाबत एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी तसे संकेत दिले आहे. शाहरुख खानला वानखेडे मैदानावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याबद्दल फेरविचार करण्यात येणार आहे. तसेच एमसीएच्या पदाधिकार्‍यांशी विचारविनियम करून बंदी उठवायची की नाही याबद्दलचा निर्णय घेणार असल्याचं विलासराव देशमुख यांनी सांगितलं आहे.

मुंबईतील वानखेडे मैदानावर 16 मे रोजी कोलकाताने मुंबईला पराभूत केले आणि कोलकाताच्या रायडर्संनी एकच जल्लोष केला. बक्षीस वितरणानंतर टीमचा मालक शाहरुख खान आपल्या मुलांना आणण्यासाठी मैदानावर घुसला. मैदानावर घुसण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षारक्षकांनी शाहरुखला हटकले मात्र ऐटीत असलेल्या शाहरुखने सुरक्षारक्षकांशी बाचाबाची केली. यावेळी एमसीएचे अधिकार्‍यांनी धाव घेतली पण शाहरुखने त्यांनाही शिवीगाळ केली. 'जिंदा गाड दूंगा' अशी धमकीही शाहरुखने दिली.

शाहरुख दारु प्यायलेला होता असा आरोपही अधिकारी केला होता. शाहरुखच्या या वागण्यामुळे व्यथीत झालेल्या एमसीएच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा दाखल केला. दुसर्‍या दिवशी शाहरुखने पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मी माझ्या मुलांना घेण्यासाठी मैदानावर गेलो होते यावेळी सुरक्षारक्षकांनी मुलांशी गैरवर्तन केलं त्यामुळे मी संतापलो आणि त्यांना शिवीगाळ केली. याबद्दल त्यानी माझी माफी मागावी अशी मागणी केली. या सर्व प्रकरणावर एमसीएने कारवाई करत शाहरुखला वानखेडेवर पाच वर्षांची बंदी घातली.

काल रविवारी आयपीएलच्या फायनलमध्ये कोलकाताने चेन्नईला हरवून पहिल्यांदाच जेतेपद पटकावलं. आपलं स्वप्न साकार झाल्यामुळे शाहरुखने एकच जल्लोष केला. यावेळी शाहरुखने वानखेडेवर झालेल्या प्रकरणामुळे माझ्या मुलांना आणि चाहत्यांना माझ्या गैरवर्तनामुळे दुख झालं. मला तसं वागायला नको होतं त्यामुळे मी त्यांची माफी मागतो असे उद्गार शाहरुखने काढले. शाहरुखला ही त्या प्रकरणाचा पश्चाताप झाल्याचं स्पष्ट दिसतं होतं. आज आम्ही अखेर आयपीएलची फायनल जिंकली हा आनंद खूप वेगळा आहे माझे चाहते वानखेडेवरील गैरवर्तनाबद्दल मला माफ करतील अशी अपेक्षाही शाहरुखने व्यक्त केली.

आज एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना शाहरुख खानवरील वानखेडेवरील बंदी मागे घेण्याचे संकेत दिले. या प्रकरणाबद्दल सर्व पदाधिकार्‍यांनी चर्चा करणार असून त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं. उद्या जर शाहरुखवरील बंदी मागे घेतली गेली तर 'हार के भी जितने वाले को बाजीगर कहते है' असंच म्हणावं लागेल.

संबंधित बातम्या

शाहरुखचा खुलासा शाहरुखबद्दल विलासरावांची सावध भूमिका वानखेडेवर 'डॉन' इन अ ॅक्शन ! ऐका शाहरुखचं भांडण शाहरुखचा वानखेडेवर राडाशाहरुखवर गुन्हा दाखल

close