स्वाभिमानी संघटनेने काढली ढोबळेंची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

May 29, 2012 2:53 PM0 commentsViews: 30

29 मे

राज्यातल्या दुष्काळाचं खापर माध्यमांच्या माथी फोडणार्‍या पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळेंवर सर्वत्र टिकेची झोड उठली आहे. सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ढोबळेंची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत त्यांच्या वक्त्व्याचा निषेध नोंदवला. ही प्रेतयात्रा स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली . चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्च्याने जाऊन ढोबळेंचा निषेध केला. यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. भाजपने सुद्धा ढोबळेंवर टीका केली.

close