डॉ.सुदाम मुंडेंविरोधात अटक वॉरंट जारी

May 28, 2012 4:24 PM0 commentsViews: 2

28 मे

परळीतल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असलेला डॉ. सुदाम मुंडे आज सात दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अखेर आज पोलिसांनी त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. तो वेळीच शरण न आल्यास त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेशही कोर्ट काढू शकतं. सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉक्टर सुदाम मुंडेंविरोधात MTP, PCPNDT कायद्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहे. त्याच्या अटकेचे आदेशही अंबाजोगाई आणि परळी कोर्टाने दिले आहेत. पण डॉक्टर मुंडे दांपत्य मात्र अजून फरार आहे.

close