दिल्लीत पेट्रोल 1 रुपया 26 पैशांनी स्वस्त

May 28, 2012 5:03 PM0 commentsViews: 2

28 मे

एकीकडे देशभरात पेट्रोलच्या किंमतीत भडका उडाला असताना दिल्लाकरांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली सरकारने पेट्रोलवरचे कर कमी करण्याची घोषणा केली. दिल्लीत पेट्रोल आता 1 रुपये 26 पैशांनी स्वस्त होणार आहे. त्याची किंमत असणार आहे, 71 रुपये 48 पैसे…वाढलेल्या किंमतीवर 20 टक्के व्हॅट आकारायचा नाही असा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. पण त्याचवेळी सीएनजी वरच्या व्हॅटमध्ये मात्र 5 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे सीएनजी महागणार आहे. गोवा, उत्तराखंड आणि केरळनं यापूर्वीच पेट्रोलचे दर कमी केले आहे.

close