आदर्श प्रकरणी 7 आरोपी तुरुंगाबाहेर

May 29, 2012 8:59 AM0 commentsViews: 2

29 मे

आदर्श घोटाळ्यात अटक केलेल्या सातही आरोपींना अखेर जामीन मिळाला आहे. 60 दिवसांनंतरही सीबीआय आरोपपत्र दाखल करू शकलं नाही. म्हणून हे आरोपी तुरुंगाबाहेर पडले आहेत. जामिनावर सुटका झालेल्यांची आर्थर रोड जेलमधून सुटका झाली. प्रदीप व्यास , पी व्ही देशमुख , आर सी ठाकूर , अे.आर .कुमार आणि टी.के .कौल यांची आर्थर रोड जेलमधून सुटका झाली आहे. गिडवाणी तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आहे. तर एम.एम.वांचू यांनी जामिनाचे 5 लाख न भरल्याने त्यांची उद्या सुटका होणार आहे.

आदर्शप्रकरणी अटक केलेल्या सात आरोपींना दिलासा मिळाला. कारण अटक होऊन 60 दिवस उलटले तरी सीबीआयनं त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं नाही. त्यामुळे कोर्टानं 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर 7 जणांना जामीन दिला. या सात जणांना दर मंगळवारी आणि शुक्रवारी सीबीआय ऑफिसमध्ये हजेरी लावणं मात्र बंधनकारक असेल.

यांना मिळाला जामीनआदर्शचे चीफ प्रमोटर आर. सी. ठाकूर, निवृत्त ब्रिगेडियर एम.एम.वांच्छू, नगरविकास खात्याचे माजी उपसचिव पी.व्ही. देशमुख, को प्रमोटर कन्हैयालाल गिडवानी, निवृत्त मेजर जनरल ए.आर. कुमार, निवृत्त मेजर जनरल टी.के.कौल, माजी जिल्हाधिकारी प्रदीप व्यास यांना जामीन मंजूर झाला आहे.

या सात जणांची सुटका हा सीबीआयसाठी मोठा धक्का आहे. सीबीआयचा निष्काळजीपणाच याला कारणीभूत असल्याचा आरोप याचिकाकर्ते वाय. पी. सिंग यांनी केला आहे.

दुसरीकडे संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला एक नोटीस पाठवलीय आणि त्यात आदर्शची इमारत संरक्षण मंत्रालयाचीच आहे, असा दावा केला. सरकारने दोन महिन्यात जागा संरक्षण खात्याकडे द्यावी, नाहीतर कोर्टात जाण्याचा इशारा नोटीशीत देण्यात आला.

close